जात पडताळणी आता ऑनलाईन…

24 प्राईम न्यूज 1 jan 2025
जात पडताळणी, विद्यार्थी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहेत. त्यामुळे जात पडताळणीच्या कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा निराधारांना लाभ देताना होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे महत्त्वाचे आदेश दिले.