निजाम पैलवान नॅशनल विद्यापीठ कुस्ती अंतर्गत 92 किलो वजनी गटात ऑल इंडिया साठी निवड..

आबिद शेख/अमळनेर.. आपल्या अमळनेरचा उभरता सितारा कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान हाजी शब्बीर पैलवान यांचे पुतणे तसेच हसन बिजली पैलवान यांचे चिरंजीव निजाम अली पैलवान यांची नुकत्याच झालेल्या नॅशनल विद्यापीठ कुस्ती अंतर्गत 92 किलो वजनी गटात ऑल इंडिया साठी निवड करण्यात आली.
निजाम अली पैलवान पंजाब भटिंडा येथे होणाऱ्या ऑल इंडिया कुस्तीसाठी रवाना झालेला आहे.
निजाम हा धनदाई कॉलेजच्या विद्यार्थी असून त्याचे कॉलेज स्तरावर सुद्धा अभिनंदन ठराव करण्यात आला तसेच अमळनेर शहरतील कुस्ती प्रेमिंकडूनही अभीनंदन होत आहे