अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा..

0

24 प्राईम न्यूज 4 Jan 2024. -‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनाकार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते. परंतु निवडणूक जवळआल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावरअर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जाची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडूनपैसे परत घेण्यात आले आहेत.

अन्यत्रही कारवाई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण • योजनेच्या पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविले जाणार आहे. या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली, पालघर या जिल्ह्यांतून आलेल्या आहेत. तक्रारीच्या निमित्ताने केसरी व पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता सर्वच अर्जाची छाननी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!