माळी महासंघ आयोजित वधू वर परिचय मेळाव्यासाठी बैठक संपन्न…! तालुकाध्यक्ष पदी अमोल माळी यांची निवड…!!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने दि.२५ जानेवारी रोजी,लेवा भवन,जळगाव येथे वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आज दि. ७ रोजी अमळनेर तालुक्याची बैठक माळी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या बैठकीत विवाह इच्छूक वधू-वरांशी संपर्क साधून जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले,ह्यामुळे ह्या धकाधकीच्या जिवनात एकाच दिवशी सर्व विवाह इच्छुक वधू वरांची ओळख होत असते व परिचय पुस्तकाच्या माध्यमातून घरबसल्या समाजातील विवाह स्थळांची माहिती मिळत असल्याने सर्व पालकांच्या वेळेची बचत होते व विवाह जुळविणे सोपे होणार असल्याने जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्याचे आवाहन माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हाध्यक्ष शामराव पाटील,भास्कर पाटील,विभागीय अध्यक्ष प्रा. भिमराव महाजन,जिल्हा पदाधिकारी प्रा.हिरालाल पाटील,प्रा.नितीन चव्हाण,मुरलीधर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर तालुकाध्यक्ष पदी भिलाली येथील अमोल दिनेश माळी यांची निवड करण्यात आली.यावेळी विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी करणारे पत्रकार बाबुलाल पाटील, ग्रामसेवक संघटनेच्या मानद अध्यक्षपदी विजय सखाराम माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष दिलीप आत्माराम पाटील,उपाध्यक्ष दिनेश माळी,सचिव विजय माळी,गिरधर पाटील,प्रशांत महाजन उपस्थित होते, सूत्रसंचालन अमोल माळी यांनी केले तर आभार प्रा. हिरालाल पाटील यांनी मानले.