जळगांव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे क्रिकेटर संजय पवार जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित..

0

आबिद शेख/ अमळनेर. संजय पवार अष्टपैलू खेळीने जिल्हा क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून अनेक स्पर्धा गाजवत आपली क्रिकेट मैदानावरील कारकिर्द गाजवली आहे. अमळनेर येथील केवळाबाई क्रिकेट क्लब व रवी स्पोर्टस तर्फे खेळत आपण अनेक संस्मरणीय खेळी केल्यात. १९८९ ते १९९४ पर्यंत जसदनवाला स्पर्धेर्त जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व केले. यातून १९९० व १९९१ ह्या दोन वर्षी राज्यस्तरीय संगठा ट्रॉफीसाठी आपली निवड झाली. १९८६ ते २००० अशी सलग चौदा वर्षे आपली राज्य एस.टी. संघात निवड झाली. या संघातर्फे अखिल भारतीय स्पर्धेत आणि प्रतिष्ठेच्या टाइम्स ट्रॉफी स्पर्धेतही संस्मरणीय खेळी खेळलात. एकदा संघात घेतले नसतांनाही आपण निराश न होता एस.टी.चा दुसरा संघ रायगड येथील फायनलमध्ये पोहचल्याचा निरोप मिळाल्यावर तितक्याच खिलाडूवृत्तीने मिळालेल्या संधीचे सोने करत फायनलमध्ये सहा विकेट घेऊन आपल्या संघाला अवघ्या सहा धावांनी विजेतेपद मिळवून दिले. या अतुलनीय कामगिरीनंतर आपणांस एस. के. हे टोपण नाव मिळाले.

१९९२ साली आपण इंग्लंड दौरा केला. पुढील दोन वर्षे आफ्रिकन देश टांझानिया कडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. एस.टी. महामंडळ सेवेतून निवृत्त झाल्यावर अमळनेर येथे नवोदित खेळाडू घडविण्याचे कार्य करत आहात. शिवाय जिल्हा संघ निवड समितीत चीफ सिलेक्टर म्हणूनही अबाबदारी भार पाडीत आहात. आजवर क्रिकेटच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल १२ व्या मास्टर्स चषक स्पर्धेच्या निमित्ताने जळगाव शहर व तालुका किकेट असोसिएशनतर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविन्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!