अमळनेर तालुकास्तरीय जि.प. क्रीडा स्पर्धात बांधकाम विभागाचे वर्चस्व…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर जिल्हा परिषद अंतर्गत तालुकास्तरीय जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धांमध्ये बांधकाम विभागाने सांघिक स्पर्धेत विजय मिळवला. स्पर्धांचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्पर्धा क्रिकेट, रस्सीखेच, रनिंग, कॅरम, बुध्दीबळ व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या व प्रताप महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, प्राचार्य विनोद अमृतकार, केंद्रप्रमुख रविंद्र पाटील, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंके, किरण शिसोदे, अशोक सोनवणे, दिलीप सोनवणे, राजेंद्र गवते, छगन पाटील, प्रविण वाडीले, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण नुसार जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार-प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य, शारिरीक सुदृढता, एक संघपणे काम करणे याबाबत प्रभावी सहाय्य होण्यासाठी जिल्हा परिषद जळगाव तर्फे तालुका व जिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धांचे नियोजन तालुका क्रीडा समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी एन.आर.पाटील व सचिव तथा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक दत्तात्रय सोनवणे व डॉ.कुणाल पवार तसेच क्रीडा समन्वयक म्हणून क्रीडा शिक्षक सुनिल वाघ यांनी काम पाहिले.
पंच/परिक्षक म्हणून- सुनिल वाघ, योगेश पाटील, कैलास बाविस्कर, संजय पाटील, उमेश काटे, जयेश मासरे, मयुर बारस्कर, विवेक अहिरे, अतुल बोरसे, सॅम शिंगाणे, जितेंद्र बाविस्कर, विशाल गावित यांनी जबाबदारी सांभाळली.
विलास मोरे, अरुण मोरे, संदिप वाघ व किरण बाविस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.
क्रीडा स्पर्धा व विजयी संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे
रनिंग (पुरुष) विजेता – अजय बोरसे (खडके),उपविजेता – महेंद्र पाटील (रणाईचे) ,रनिंग (महिला) विजेता – दिपाली पवार (फापोरे) ,उपविजेता – रोहिणी पाटील (कलाली) ,रस्सीखेच (पुरुष)
विजेता – बांधकाम विभाग , उपविजेता – फापोरे बीट (शिक्षण) ,रस्सीखेच (महिला)
विजेता – अमळगाव बीट (शिक्षण) , उपविजेता – फापोरे बीट (शिक्षण) ,क्रिकेट (पुरुष)
विजेता – बांधकाम विभाग
उपविजेता – आरोग्य विभाग , बुध्दिबळ (पुरुष)
विजेता – दिपक बोरसे (बांधकाम) ,उपविजेता – संजय महाजन (गांधली) ,बुध्दिबळ (महिला)
विजेता – पुनम पाटील (खवशी) ,कॅरम (पुरुष)
विजेता – प्रमोद पाटील (शिक्षण) ,उपविजेता – सागर नराल (आरोग्य) ,बॅडमिंटन (पुरुष)
विजेता – डॉ.गिरीष गोसावी (तालुका वैद्यकीय अधिकारी) ,उपविजेता -डॉ.अतुल चौधरी (शिरुड) ,बॅडमिंटन (महिला)
विजेता – मोहिनी पाटील (निंभोरा) ,उपविजेता – आशा महाजन (सारबेटे) ,सांस्कृतिक विभाग ,गायन (पुरुष)प्रथम – प्रविण पाटील (पिंगळवाडे) ,द्वितीय -सोमनाथ विसपुते (मंगरुळ),तृतिय – चंद्रकांत पाटील (शिरुड),गायन (महिला),प्रथम – योगिता साळुंखे (शिरसाळे)
द्वितीय – दिपाली निकुंभ (वाघोदा), नृत्य (पुरुष)
प्रथम – सुधीर चौधरी (तांदळी)
द्वितीय- डॉ.कुणाल पवार (ढेकू), नृत्य (महिला)
एकल प्रथम – डॉ.पूजा वाघुळे (गांधली) ,समूह प्रथम – महिला मंच (शिक्षिका)
,नाटिका (पुरुष)
प्रथम – योगेश कापडणे (मारवड) कुणाल पवार यांनी विनोदी पद्धतीने क्रिकेट स्पर्धांचे समालोचन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.