अमळनेर तालुकास्तरीय जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

0

आबिद शेख/ अमळनेर

पं.स.अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, स्थानिक कार्यालय कर्मचारी यांचा उत्स्फुर्त सहभाग…

शनिवार-रविवार, दि.04 व 05 जाने. रोजी अमळनेर तालुकास्तरीय जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धांचे आयोजन शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर (क्रिकेट, रस्सीखेच, रनिंग, कॅरम, बुध्दीबळ व सांस्कृतिक) व प्रताप महाविद्यालय अमळनेर (बॅडमिंटन) या 2 ठिकाणी करण्यात आले होते. स्पर्धेची सुरुवात क्रिकेट या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकाराने उद्घाटन कार्यक्रम स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचे शुभहस्ते व गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, प्राचार्य विनोद अमृतकार, केंद्रप्रमुख रविंद्र पाटील, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंके, किरण शिसोदे, अशोक सोनवणे, दिलीप सोनवणे, राजेंद्र गवते, छगन पाटील, प्रविण वाडीले, ज्ञानेश्वर पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत नारळ वाढून करण्यात आले.

[महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण व जळगाव जिल्हा क्रीडा समिती नियोजन बैठकीतील निर्णय नुसार जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार-प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य, शारिरीक सुदृढता, एक संघपणे काम करणे याबाबत प्रभावी सहाय्य होण्यासाठी जिल्हा परिषद जळगाव तर्फे तालुका व जिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात क्रिकेट, रस्सीखेच, रनिंग, बॅडमिंटन, कॅरम व बुध्दीबळ या 6 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यासोबत सांस्कृतिक प्रकारात गीतगायन, नृत्य व नाटीका यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन यासाठी तालुका क्रीडा समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी एन.आर.पाटील व सचिव तथा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक म्हणून उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे व डॉ.कुणाल पवार तसेच क्रीडा समन्वयक म्हणून क्रीडा शिक्षक सुनिल वाघ यांनी काम पाहिले.

क्रीडा प्रमुख तथा केंद्रप्रमुख म्हणून – शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंके, किरण शिसोदे, रविंद्र पाटील, अशोक सोनवणे, दिलीप सोनवणे, राजेंद्र गवते यांनी तर

पंच/परिक्षक म्हणून- सुनिल वाघ, योगेश पाटील, कैलास बाविस्कर, संजय पाटील, उमेश काटे, जयेश मासरे, मयुर बारस्कर, विवेक अहिरे, अतुल बोरसे, सॅम शिंगाणे, जितेंद्र बाविस्कर, विशाल गावित यांनी जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेचे नियोजन व आयोजन साठी दत्तात्रय सोनवणे, डॉ.कुणाल पवार, विलास मोरे, अरुण मोरे, सुनिल वाघ, योगेश पाटील, संदिप वाघ व किरण बाविस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेचा क्रीडा प्रकार निहाय निकाल खालीलप्रमाणे…

रनिंग (पुरुष)
विजेता – अजय बोरसे (खडके)
उपविजेता – महेंद्र पाटील (रणाईचे)
रनिंग (महिला)
विजेता – दिपाली पवार (फापोरे)
उपविजेता – रोहिणी पाटील (कलाली)

रस्सीखेच (पुरुष)
विजेता – बांधकाम विभाग
उपविजेता – फापोरे बीट (शिक्षण)
रस्सीखेच (महिला)
विजेता – अमळगाव बीट (शिक्षण)
उपविजेता – फापोरे बीट (शिक्षण)

क्रिकेट (पुरुष)
विजेता – बांधकाम विभाग
उपविजेता – आरोग्य विभाग

बुध्दिबळ (पुरुष)
विजेता – दिपक बोरसे (बांधकाम)
उपविजेता – संजय महाजन (गांधली)
बुध्दिबळ (महिला)
विजेता – पुनम पाटील (खवशी)

कॅरम (पुरुष)
विजेता – प्रमोद पाटील (शिक्षण)
उपविजेता – सागर नराल (आरोग्य)

बॅडमिंटन (पुरुष)
विजेता – डॉ.गिरीष गोसावी (THO)
उपविजेता – डॉ.अतुल चौधरी (शिरुड)
बॅडमिंटन (महिला)
विजेता – मोहिनी पाटील (निंभोरा)
उपविजेता – आशा महाजन (सारबेटे)

सांस्कृतिक विभाग
गायन (पुरुष)
प्रथम – प्रविण पाटील (पिंगळवाडे)
द्वितीय – सोमनाथ विसपुते (मंगरुळ)
तृतिय – चंद्रकांत पाटील (शिरुड)
गायन (महिला)
प्रथम – योगिता साळुंखे (शिरसाळे)
द्वितीय – दिपाली निकुंभ (वाघोदा)

नृत्य (पुरुष)
प्रथम – सुधीर चौधरी (तांदळी)
द्वितीय- डॉ.कुणाल पवार (ढेकू)

नृत्य (महिला)
एकल प्रथम – डॉ.पूजा वाघुळे (गांधली)
समूह प्रथम – महिला मंच (शिक्षिका)

नाटिका (पुरुष)
प्रथम – योगेश कापडणे (मारवड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!