वधू -वर परिचय मेळाव्यात नाव नोंदणीचे माळी महासंघाचे आवाहन –

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर माळी समाज महासंघ जळगाव जिल्हा आयोजित वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन ता.२५ रोजी करण्यात आले आहे. यासाठी अमळनेर तालुक्यातील माळी समाज बांधवानी आपल्या उपवर वधू -वरांची नाव नोंदणी करावी असे आवाहन माळी महासंघाच्या पदाधिकारी यांनी केले आहे. नाव नोंदणी साठी ता. १५ जानेवारी पर्यंत करावी असे कळविण्यात आले असून नाव नोंदणी साठी कळमसरे येथील मुरलीधर चौधरी प्रा. हिरालाल पाटील, गांधली येथील प्रा. नितीन चव्हाण, अमळनेर येथील भीमराव महाजन, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अमोल माळी यांच्याशी संपर्क करावा.