पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे —मकसूद बोहरी

अमळनेर (प्रतिनिधि) पाडळसे धरण जन आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या तालुक्याच्या विकास व्हावा
याकरता प्रयत्न करीत आहे. मूक मोर्चा काढून, जेलभरो आंदोलन, भीक मांगो आंदोलन, साकाळी उपोषण, जलसमाधी अशा अनेक मार्गाने त्यांनी आंदोलन आजपर्यंत केलेले आहे. परंतु सरकार दरबारी त्यांची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही व आजपर्यंत पाडळसे धरणाला अत्यंत कमी निधी मिळालेला आहे त्यामुळे हे धरण पूर्ण होऊ शकलेले नाही. आपणास केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस निधीची अपेक्षा आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यासह सहा तालुक्यांना त्याच्या लाभ मिळणार आहे ते म्हणजे अमळनेर, धरणगाव, पारोळा ,धुळे, शिंदखेडा आणि चोपडा. हा धरण पूर्ण झाल्यास झाल्यास त्यात १९ टीएमसी पाण्याच्या मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होणार आहे. आणि हे सर्व तालुके सुजलाम सुफलाम होणार म्हणजेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती,कृषी क्षेत्रात फार मोठे बदल कापूस सारखे पिकांद्वारे जास्त उत्पन्न घेता येणार , कारखानदारीस मोठ्या प्रमाणात वाव मिळणार वगैरे फायदे होणार आहेत. अमळनेर तालुक्याला पूर्वीसारखे गत वैभव प्राप्त होणार यात कोणतीही शंका नाही.
पाडळसरे जन आंदोलन समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब सुभाष चौधरी व त्यांचे सहकारी यांनी पुढील प्रमाणे मोर्चात सामील होण्याचे आवाहन केलेले आहे.
९फेब्रुवारी२०२३, वार गुरुवार ठिकाण- बळीराजा धुळे रोड प्रांत कचेरी जवळ, वेळ- दुपारी १२ वाजता .
शालेय विद्यार्थी व नागरिकांनी लिहिलेले ५१ हजार पत्रे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टाकणार आहेत व पुढे ते सरकार दरबारी मंत्रालयात पोचणार आहेत .मी व माझे कुटुंबीय या मोर्चात सहभागी होणार आहोत. आपणही या मोर्चात सहभागी होऊन सहकार्य करावे अशी मी कळकळीची विनंती करतो .