अमळनेर पोलीसांनी केली सराईत गुन्हेगारास अटक… अमळनेर पोलिसांची कारवाई..

0

अंमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथील आरोपी विशाल विजय सोनवणे रा. फरशी रोड, अमळनेर यांने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लोखंडी फायटरने मारहाण केली व आरोपीने कमरेस लावलेले पिस्टल फिर्यादीच्या कपाळावर लावून फिर्यादीच्या खिशातून १००० रु. काढुन घेतले होते. त्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं.२८/२०२३ भा.द.वि. कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दि. २६/०१/२०१३ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासुन नमुद आरोपी विशाल विजय सोनवणे हा फरार होता.

आज रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांना मिळालेल्या माहीतीवरून आरोपी विशाल विजय सोनवणे हा निर्जन स्थळी लपुन बसला आहे. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी मिळालेल्या माहीती वरुन तात्काळ पोउनि.श्री.विकास शिरोडे, पोहेकॉ / सुनिल जाधव, पोहेको/चंद्रकांत पाटील, पोना/हिरालाल पाटील, पोकों/सागर साळुंके, पोकाँ/राहुल चव्हाण, चापोका /सुनिल पाटील अश्यांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. सदरील पथकाने निर्जन स्थळी आरोपी विशाल विजय सोनवणे यास शिताफिने ताब्यात घेतले आहे.

आरोपी विशाल विजय सोनवणे यास वरील नमुद गुन्ह्यांत अटक करुन मा.न्यायालय अमळनेर येथे तपासी अधिकारी पोउपनि विकास शिरोळे यांनी हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची ०७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

आरोपी विशाल विजय सोनवणे याचा पूर्व इतिहास पाहता तो अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर लोकांना दहशत घालणे, गंभीर जखमी करणे, जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!