भुसावळ येथील खूनप्रकरणी पाच जण अटकेत..

24 प्राईम न्यूज 14 Jan 2024. शुक्रवारी भुसावळला तेहरीन नासीर शेख याच्या खून प्रकरणी पोलिसांनी चार जणांना मनमाड येथून तर एकास बल्लारशा येथून अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दि १० जानेवारीला सकाळी साडे सात वाजता जाम मोहल्ल्यातील एका चहाच्या दुकानात तेहरीन अहमद नासीर अहमद हा चहा पित असतांना चार जणांनी दुकानात शिरून त्यास शिवीगाळ करीत त्याच्यावर गोळयाझाडल्या. व मारेकरी फरार झाले होते. जखमी तेहरीला दवाखान्यात नेण्यापूर्वीच तो मुत्य पावला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी पोलिसांनी बल्लारशा येथून आरोपी रमीज पटेल
रा भुसावळ यास ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरार आरोपी हे मनमाड येथे असल्याची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व गुन्हा शोध पथकाचे अमलदार यांचे पथक तयार करण्यात येऊन मनमाडला रवाना करण्यात आले . येथे चार जणांना एमआयडीसी एरियातून ताब्यात घेण्यात आले.