अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई..

आबिद शेख/अमळनेर..
-अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनविलेल्या पतंग यांची विक्री , वापर व साठवणूक केल्याकारणाने चार दुकानदारांना एकूण ६०००/- रुपये दंड ठोठावला. नगर परिषद आरोग्य विभाग भरारी पथकाने एकूण ८.५ किलो च्या प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या.
अमळनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून मंगळवारी दुपारी शहरातील एम. एस. किरणा, धर्मेंद्र कटारिया, जुने बस स्टेन्ड परिसर, महेश कटलरी , गंगा घाट, बाफना जनरल स्टोर , सराफ बाजार परिसर यां दुकानातून प्लास्टिक पतंग मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आल्या. बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनविलेल्या पतंग अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने सदर कारवाई मा. मुख्याधिकारी वेवो तोलू केझो (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सदर मोहिमेची अंमलबजावणी करताना नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गढरी, पथक कर्मचारी जया भारत सरदार, योगेश आधार पवार, महेंद्र नाना बिऱ्हाडे, गौतम भावलाल बिऱ्हाडे, अनंत अशोक संदानशिव, शामराव आधार करंदीकर, युनूस शेख ई. उपस्थित होते. दरम्यान मा. मुख्याधिकारी वेवो तोलू केझो (भा.प्र.से.) यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग यांचा वापर न करण्याचे व कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे व नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.