शहाआलम नगर भागात भररस्त्यातील खड्ड्यामुळे अपघाताचा धोका..

आबिद शेख/अमळनेर. शहआलम येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे छोटेमोठे अपघात होत असून नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरीत हा खड्डा बूजवावा. अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
अमळनेर शहरातील शाह आलंनगर मुख्य रस्त्यावरील खड्डा वाहन धारकांसाठी धोकेदायक ठरत आहे या खड्ड्यामुळे छोटेमोठे अपघात होत आहेत. स्थानिक प्रशासनाने या समस्येमध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा खड्डा बुजवा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे