जी.एस.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला परीक्षेत यश..

आबिद शेख/अमळनेर
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचा सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात मयूर रवींद्र कोळी हा “अ ” श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाला आहे.या परीक्षेसाठी शाळेतून एकूण ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यातून २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कलाशिक्षक के. व्ही पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शालेय समितीचे चेअरमन हरी भिका वणी,मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे,सी.एस. सोनजे,मुख्य लिपिक शाम पवार,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.