पिसाळलेल्या कुत्र्याची पिंपळे रोड कॉलनी परिसरात दहशत! एकाच दिवशी 12 जणांवर हल्ला..

आबिद शेख/अमळनेर – शहरातील पिंपळे रोड वरील कॉलनी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आज दि १५ रोजी सुमारे १० ते१२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून याबाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी व आरोग्य विभाग निरीक्षक यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविल्यावर देखील त्यांनी याबाबत दुर्लक्ष केले आहे.
आज दि १५ रोजी सकाळी ७ वाजेपासून सुमारे ४ ते ५ लहान मुले व तरुण नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असुन यातील काहींना धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे पिंपळे रोड वरील जे डी सी सी बँक कॉलनी,श्रीकृष्ण नगर,आल्हादनगर, सुंदरनगर, वर्धमान नगर, वामन नगर आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे.
याबाबत माजी नगरसेवक विवेक पाटील व काही नागरीकांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊ शकला नाही याबाबत नगरपरिषदेने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.