मोफत पतंगोत्सवात खान्देशी कलाकारांसोबत अबालवृद्धांनी धरला ठेका…! सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर थिरकले : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…

आबिद शेख/अमळनेर
सालाबादाप्रमाणे गेल्या ५ वर्षांपासून सातत्य ठेवत यंदाही मकरसंक्रांती निमित्ताने स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत पतंगोत्सवात खान्देशी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर थिरकले आणि त्यांना दाद देत उपस्थित अबालवृद्धांनी ठेका धरत कार्यक्रमात रंगत आणली.
प्रभाग १७ च्या भावी नगरसेविका तथा महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्षा
स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील हे दाम्पत्य समाजहित जोपासत नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभागातील तसेच तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत पतंगोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात खानदेशातील प्रसिद्ध अहिराणी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांनी खानदेशी गाण्यावर ठेका धरत उपस्थित शेकडो अबालवृद्ध नागरिकांनाही नाचवले.
यावेळी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, पत्रकार रवींद्र मोरे, कैलास महाजन, दिलीप ठाकूर, कैलास सोनार, विजय पाटील यांची विशेष उपस्थित होती.
या महोत्सवाला श्रीकृष्ण व देशभक्त मित्र मंडळ वड चौक यांचे विशेष सहकार्य तर दै. महादर्पण आणि महादर्पण न्यूजचे मीडिया सौजन्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश महाजन यांनी तर आभार भूषण महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी शिवम साळी, हितेश बारी,अशोक पाटील, गणेश सोनवणे,प्रविण ठाकूर, नितेश चव्हाण, गौरव सोनार, हिमांशू पाटील, समाधान नाथबुवा,जयेश बडगुजर, नीरज पाटकरी, राहुल महाजन, पंकज वाघ, बंटी भामरे, शरद पाटकरी आदींनी सहकार्य केले.