मुलगी बचावली मात्र आई-वडिलांचा मृत्यू.

आबिद शेख/अमळनेर
बदलापूर शहापूर अपघातात मृत्युमुखी पडलेले पियुष पाटील हे बृहन्मुंबई महानगर पालिकेत नोकरीला होते. तर त्यांची पत्नी वृंदा यांना अलीकडेच अमळनेर येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. मुळचे अमळनेरचे असलेले पाटील दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून बदलापूर पूर्वेकडील श्रीनिवास रेसिडेन्सी या इमारतीत कृतिका या पाच वर्षाच्या मुलीसह राहत होते. दोन महिन्यांपूर्वी अमळनेर येथे शिक्षिकेची नोकरी लागल्याने वृंदा बदलापूरला येऊन जाऊन होत्या. ९ जानेवारीला मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच हे दाम्पत्य मुलीसह अमळनेरला गेले होते. बुधवारी बदलापूरला परत येण्यासाठी पाटील दाम्पत्य मुलीसह बसने निघालेही होते. पण दुर्दैवाने घरी पोहचण्याआधीच त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.