सैफ अली खानवर चाकूने हल्ला, घरात घुसलेल्या दरोडेखोराने केले 6 वार…

24 प्राईम न्यूज 16 Jan 2024. सैफ अली खान मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये आहे, जिथे त्याचे ऑपरेशन सुरू आहे. त्याच्या शरीरावर चाकूच्या सहा जखमा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सैफच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मुंबईतील वांद्रे येथे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला हल्लेखोराशी झालेल्या झटापटीत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. सैफच्या मणक्यालाही खोल दुखापत झाली आहे.