चोपडा शहर पोलीस ठाणेकडुन गांजा वाहतुक करणा-या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या…

0

24 प्राईम न्यूज 17 Jan 2024.

दिनांक 15/01/2025 व 16/01/2025 च्या रात्री चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन दोन ठिकाणी पोलीसांनी छापा टाकुन मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.

01) पहिल्या कारवाई मध्ये चोपडा शहर पोलीस ठाणे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करुन अकुलखेडा ता चोपडा येथे दोन मोटार सायकल स्वारांना पकडुन त्यांचेकडुन चार किलो सातशे ग्रॅम गांजा हस्तगत केला असुन त्यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गु र नं 10/2025 एनडीपीएस अॅक्टचे कलम 8 (क), 20(ब) (2) (ब), 22(बी) प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन आरोपीतांस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक श्री एकनाथ भिसे हे करत आहेत.

02) त्याचप्रमाणे पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतुक चालु असल्याची माहिती मिळाल्यावरुन दुस-या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सफौ/2570 जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ/1827 हेमंत कोळी, पोहेकॉ/343 महेंद्र साळुंखे, पोकों/1558 महेंद्र पाटील, पोकों/768 रविंद्र मेढे, पोकों/1757 प्रकाश मथुरे, पोकॉ/1529 प्रमोद पवार, पोकों/1607 समा तडवी, पोकॉ/3221 अक्षय सुर्यवंशी, पोकॉ/1162 शाम धनगर, पोकॉ/2212 पंकज ठाकुर, पोकों /831 जगन्नाथ पाटील, पोकों/2560 राजेंद्र कोळी, पोकॉ/3409 रजनीकांम भास्कर अशांनी विविध पथके तयार करुन शिरपुर ते चोपडा रोडवर सापळा लावला असता एक इको कार क्रमांक एम एच 06-बी यु-5138 मधुन भरधाव वेगाने गांजा वाहतुक करणा-या पाच जणांच्या टोळीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील गाडीमधे दोन गोण्यांमध्ये भरलेले 31 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर पाच इसमांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गु र नं 11/2025 एनडीपीएस अॅक्टचे कलम 8(क), 20 (ब) (2) (क), 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पाच आरोपीतांस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक श्री जितेंद्र वल्टे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग श्री अण्णासाहेब घोलप सर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!