सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज. आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

24 प्राईम न्यूज 17 Jan 2024.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना हे मोठे गिफ्ट आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक ८ व्या वेतन आयोगाची मागील कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. लवकरच एक समिती स्थापन करून ८ वा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू झाला होता. या आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. ८ वा वेतन आयोग २०२६ पासून लागू होईल त्यामुळे ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षीच सादर केल्या जातील. या निर्णयाचा फायदा १.२ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकीचा भाग म्हणून केंद्रीय कर्मचारी प्रतिनिधी आणि विविध कामगार संघटनांनी अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत ८ वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती.