बँकेच्या अद्ययावत नूतन सभाग्रहाचे संत सखाराम महाराज यांच्या हस्ते थाटात उदघाटन..

आबिद शेख/अमळनेर. -अमळनेर अर्बन बँकेने शाखा विस्तार करून परिसरातील लोकांना आर्थिक क्षेत्रातील अमळनेर सारखी उत्कृष्ठ सेवा द्यावी असे प्रतीपंढरपूरवाडी संस्थांचे गादीपती प.पू श्री संत सखाराम महाराज यांनी अमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या अद्ययावत आधुनिक अश्या बँकिंग सुविधांनी संपन्न नूतन सभागृहाच्या उद् घाटन व सहज सुलभ बँकिंग ची माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन समारंभ प्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमती स्मिता वाघ उपस्थित होते.
दि अमळनेर को. ऑप.अर्बन बँकेचे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण होत असताना अमळनेर को.ऑप. अर्बन बँकेचे आधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न असे सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत नूतनीकरण केलेले मुख्य कार्यालयाचेआहे उद्घाटन तसेच
अमळनेर अर्बन बँकेने प्रथमच सभासद, ग्राहकांना बँकिंगची सहज सुलभ माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन प .पु.संत श्री.सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस यावेळी बँकेच्या सभागृहातील श्री गणेश मूर्तीचे पूजन संत श्री.सखाराम महाराज,खा.स्मिता वाघ यांचे हस्ते करण्यात आले.तर प.पू संत श्री.सखाराम महाराज यांचे पाद्यपूजा बँकेचे चेअरमन पंकज गोविंद मुंदडे यांनी केले.
याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडताना “अमळनेर अर्बन बँकेने शंभर कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा यशस्वीपणे गाठला असून बँक डिजिटल व ऑनलाईन करण्यासह सभासद व ग्राहकांना सेवा देण्याच्या उद्देशाने आधुनिक व अध्यायवत अशा सुविधांनी परिपूर्ण करीत असून बँकेच्या भविष्यातील वाटचालीत अमळनेरच्या वैभवात व लौकिकात भर टाकण्याचे काम संचालक मंडळ करेल असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना अमळनेर अर्बन बँक सभासदांच्या विश्वासाची बँक आहे. बँकेच्या प्रगतीसाठी शासन स्तरावरून सर्वोतोपरी सहकार्य करू.आम्ही बँकेच्या सतत पाठीशी आहोत.असे खा.स्मिताताई वाघ यांनी सांगितले. प्रास्ताविकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत पाटील यांनी बँकेच्या योजनांची आर्थिक उलाढालीची माहिती उपस्थितांना दिली.याप्रसंगी चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांचेसह संचालक प्रविण जैन,मोहन सातपुते, पंडित चौधरी,भरत ललवाणी, प्रदिप अग्रवाल,अभिषेक पाटील, लक्ष्मण महाजन, दिपक साळी, प्रविण पाटील,
सौ.वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, ऍड.व्ही आर पाटील, विजय बोरसे,बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर समारंभ प्रसंगी उपस्थित राहून बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत कुशल संचालक मंडळाला आणि कर्मचारी वर्गाला अर्बन बँकेचे माजी संचालक कुंदन शेठ अग्रवाल, गोविंद दादा मुंदडे, बजरंग शेठ अग्रवाल, विनोदभैय्या पाटील, सुभाष चौधरी, प्रविणबापू पाटील, डॉ.शशांक जोशी, जयेश शहा, लालचंद सैनानी, प्रतिष्ठित व्यावसायिक सरजूशेठ गोकलानी,रामदास निकुंभ , राजीव मुंदडे, प्रकाश मुंदडे,जितेंद्र जैन, मुरली शेठ बितराई,खा.शी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किरण पाटील , ॲड.आर डी चौधरी,ॲड.विवेक लाठी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत , किरण पाटील,सचिव जितेंद्र ठाकूर,पत्रकार राजकुमार छाजेड,मुन्ना शेख यांचेसह दशरथ लांडगे, मा.उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, मा.नगरसेवक विनोद कदम, राजू फाफोरेकर, विवेकानंद भांडारकर, बाळासाहेब देशमुख,प्रसाद शर्मा, दिलीप देशमुख, संजय कासार,शितल देशमुख,नरेंद्र निकुंभ,कुंदन निकम,दत्ता कासार,अनिलदादा जोशी, प्राचार्य रविंद्र सोनवणे, श्रीमती चावरीया, दिलीप भावसार , अनिल रायसोनी,जितेंद्र कटारिया,महावीर पहाडे,प्रशांत सिंघवी, डी आर पाटील,आदिंसह बँकेचे ज्येष्ठ सभासद , माजी संचालक, माजी कर्मचारी व पिग्मी एजेंट, बँकेचे ग्राहक, विविध क्षेत्रातील व्यावसायिक,उद्योजक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व्यवस्थापक संचालक मंडळ व कर्मचारी वृंद ,पिग्मी एजेंट यांनी परिश्रम घेतले.