गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथे हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन..

“जुळवू अभ्यासासोबत क्रीडांचा मेळ..
लावू स्वतःला यशस्वी जीवनाचे वेड..“ या विचाराने प्रेरित होऊन..
छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड येथे दि.20 व 21 जानेवारी 2025 या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व त्यासोबत शारीरिक व मानसिक विकास महत्वाचा असतो. वर्षभर अध्ययनातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधला जातो परंतु विद्यार्थ्यांना विविध क्रीडा गुण अवगत व्हावेत त्याचप्रमाणे त्यांचा शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळेत हिवाळ्यात सालाबादप्रमाणे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या दोन दिवसात विद्यार्थ्यांकडून तेरा प्रकारचे विविध मैदानी खेळ खेळले जातील.
सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत “शेतकरी जगाचा पोशिंदा” या विषयावर यश प्राप्त करणारी शाळेतील इ.9वीची विद्यार्थिनी कु.अक्षदा शांताराम पाटील हिच्या हस्ते केले गेले. अक्षदा पाटील चे कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी रोख 500 रु,गजानन महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सदर क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश सुर्यवंशी सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केलेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार दादासो कृषीभूषण साहेबराव पाटील होते. त्यांच्यासमवेत माजी सरपंच हरी पाटील, मधुकर पाटील, अरुण पाटील,निळकंठ पाटील, गोकुळ पाटील, नितीन पाटील, निखिल पाटील, राकेश पाटील, मयूर पाटील आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले.