अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. -महसूल विभागाची कार्यवाही

आबिद शेख /अमळनेर. अमळनेर तालुक्यातील मुड़ी प्र.डांगरी येथे महसुलच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केली आहेत मौजे मुड़ी प्र.डांगरी येथे मा.उपविभागीय अधिकारीसो अमळनेर भाग श्री.नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच मा.तहसीलदारसो अमळनेर श्री.रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रेक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रेक्टर मुद्देमालासह अमलनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात यांच्या समवेत , श्री.पी. एस. पाटील मंडळ अधिकारी वावडे भाग, श्री. व्ही. पी.पाटील मंडळ अधिकारी नगांव, श्री.ऐ बी सोनवणे ग्राम महसूल अधिकारी अमळनेर, श्री.आशिष पारधे ग्राम महसूल अधिकारी सारबेटे, जितेंद पाटील ग्राम महसूल अधिकारी शिरसाले बु, श्री.एम आर पाटील ग्राम महसूल अधिकारी जैतपीर~मांडळ हे होते सदरील ट्रैक्टर चालकाचे नाव व ट्रेक्टर व ट्रॉली ची माहिती खालील प्रमाणे १)ट्रैक्टर मालकाचे नाव मनोज देडगे ट्रेक्टर MH 19 BG 4665 ट्रॉली नंबर नसलेली लाल रंगाची, २)शुभम सूर्यवंशी Mh 18 BX 5866 ट्रॉली नंबर नसलेली हिरव्या रंगाची , ३)सुनील भील NEW PASSING ट्रॉली नंबर MH 19 AN 7636 असे होते