अमळनेरात तीन दिवसांचे मोफत योग शिबिर – आरोग्यासाठी सुवर्णसंधी..

आबिडद शेख/अमळनेर. अमळनेर मध्ये महिला पतंजली योग समितीच्या वतीने २२ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत तीन दिवसांच्या मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात दररोज सकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत पार पडेल.
शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून, खासदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, तसेच योगरत्न पुरस्कार विजेत्या संजीवनी माने आणि महानंदा पाटील यांची उपस्थिती असेल.
या शिबिरामध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब, कंबरदुखी, एकाग्रता सुधारणा, संधिवात, मधुमेह आणि अन्य आजारांवर उपाययोजना करणाऱ्या योग क्रिया शिकविल्या जातील. महिला, पुरुष आणि तरुण-तरुणींसाठी हे शिबिर पूर्णतः मोफत आहे.