जळगावात हृदयद्रावक घटना: रेल्वे बोगीतील आगीच्या दहशतीने १२ प्रवाशांचा मृत्यू ४० जण जखमी..

24 प्राईम न्यूज 23 Jan 2025. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते शिरसोली दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरूनजिल्ह्यातील पाचोरा ते शिरसोली दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं असून या रेल्वेखाली आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांचा आकडा ८ ते १२ सांगण्यात येत असून प्रशासनाने धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस पाचोराच्या दिशेने येत असताना ५ वाजेच्या सुमारास रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवले. या घटनेत ८ ते १२ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, रेल्वेचे अधिकारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. जखमींनाकर्नाटक एक्सप्रेसने जळगावला हलविण्यात आले असून शक्य ती सर्व मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.