अमळनेरातील मूर्तीला झालेली विटंबना: सीसीटीव्हीने उघड केले सत्य..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर शहरात गणपतीच्या मंदिरावर अज्ञात व्यक्तीने शेण मारल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले. एपीआय रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ आणि राजू जाधव यांच्या नेतृत्वात पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
घटनेच्या तपासात CCTV फुटेजमधून एक महिला या कृत्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे जातीय तणावाची अफवा विरामास आली. शांतता कायम राखण्यासाठी माजी नगरसेवक गोपी कासार, सूरज परदेशी, विजय पाटील, प्रमोद शिंपी यांसारख्या प्रतिष्ठित नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अमळनेरमध्ये परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.