महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025: धुळे जिल्ह्याच्या मल्लांचा दमदार प्रदर्शन!

आबिद शेख/अमळनेर
अहिल्यादेवी नगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये धुळे जिल्ह्याच्या मल्लांनी आपली ताकद सिद्ध केली. पै. शेखर गवळी यांनी 86 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले, तर पै. पुरुषोत्तम विसपुते यांनी 61 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या यशाबद्दल दोन्ही मल्ल योद्ध्यांचे श्री. पै. कल्याण (भाऊ) गरुड (मा. अध्यक्ष: धुळे तालुका तालीम संघ, कार्याध्यक्ष: पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य) आणि सर्वधर्मसमभाव मल्ल योद्धा प्रतिष्ठान, धुळे यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
धुळे जिल्ह्याच्या या कुस्तीपटूंनी राज्य पातळीवर केलेल्या उत्तम कामगिरीमुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.