मोबाईल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत संघटनेच्या बळकटीवर भर

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – शहरातील शिवसेना कार्यालयात मोबाईल व्यापारी असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बी. महाजन होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून झाली.
बैठकीत व्यापाऱ्यांनी संघटित होऊन निर्णय घेणे कसे फायदेशीर ठरेल, यावर चर्चा झाली. व्यापारी हिताच्या निर्णयांसाठी संघटना भक्कमपणे उभी राहील, असे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. तसेच मोबाईल व्यापारातील अडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी संघटित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान अमित ललवाणी, राजू साळी, विशाल भावसार (भिमा), दिनेश पाटील, आकाश बठेजा, महेश नागदेव, तोसिफ शेख, विशाल नाथ, दिनू आबा, मोनू चौधरी, प्रेम बीतराई यांसह अनेक व्यापाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. व्यापारी हिताचे निर्णय एकमताने मंजूर करत हात उंचावून पाठिंबा दर्शवण्यात आला.
या वेळी शरद चौधरी, धीरज जैन, तन्वीर मोमीन, रेहान शेख, अमोल पाटील, निलेश राठोड, संजय भावसार, निलेश कोळी, बिलाल मणियार, पवन बीतराई, अजय पवार, मनीष पंजवाणी, विष्णू पाटील, काटे बंधू, प्रवीण पाटील, मोहित बीतराई, वसीम शेख, संजय आयलाणी, नदीम खाटीक, सुनील शर्मा, अतुल चौधरी, दीपक लालसाई, सूचित बजाज, शरद पवार, दर्शन लोढा, राकेश बिऱ्हाडे, समाधान माळी, रॉकी पवार आदींसह असंख्य व्यापारी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन अमित ललवाणी यांनी केले, तर राजू साळी यांनी आभार मानले. मोबाईल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.