५२ वर्षांनी जुन्या मित्रांचा स्नेहमेळावा: आठवणींना उजाळा..

0

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर सु.हि. मुंदडा हायस्कूल, मारवड येथे १९७२-७३ च्या ११ वीच्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल ५२ वर्षांनी उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. दिवंगत शिक्षक व वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंढरीनाथ आत्माराम सोनवणे यांनी प्रस्ताविक केले, तर दिलीप गणपत पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडला.

गुरुजनांचा सत्कार स्मृतीचिन्ह व कुबेर लॅम्प देऊन करण्यात आला. अध्यक्ष एस.एम. पाटील, एस.बी. पवार, जे.एस. पाटील, शांताराम पाटील, एस.बी. चौधरी, एच.इन. मारवडकर, भाऊसाहेब सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत शिक्षकांच्या धर्मपत्नींनी सत्काराचा स्वीकार केला.

वर्गमित्रांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुरुजनांनीही आपली भावना व्यक्त केली. अध्यक्ष एस.एम. पाटील यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जगन्नाथ पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिजाबराव विश्वासराव शिसोदे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर स्नेहभोजन आणि ग्रुप फोटोच्या माध्यमातून उपस्थितांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार करत पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!