अमळनेरला डीवायएसपी; विनायक कोते यांची नियुक्ती

आबिद शेख/अमळनेर.
अमळनेर: नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बाजीराव कोते यांची अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून अमळनेर डीवायएसपी पद रिक्त होते, त्यामुळे चोपड्याचे डीवायएसपी आबासाहेब घोलप यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दोन विभागांचा एकाच अधिकाऱ्यावर ताण पडत असल्याने प्रशासनावर परिणाम होत होता.
विनायक कोते यांच्या नियुक्तीनंतर विभागीय पोलीस व्यवस्थापन अधिक सक्षम आणि सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.