अपघातग्रस्त तरुणाला मदतीचा देवदूत – आमदार मंगेशदादा चव्हाण..

0

आबिद शेख/अमळनेर. -हिंगोणे खुर्द गावाच्या मागे लोहारा पाचोरा येथील एका तरुणाचा मोटारसायकल अपघात झाला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, चेहऱ्यावर मार लागल्याने तो हालचालही करू शकत नव्हता. दुर्दैवाने, आसपास कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते.

योगायोगाने त्याचवेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण जळगावकडे जात होते. अपघातग्रस्त तरुण पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाड्या थांबविल्या आणि तात्काळ मदतीचा हात पुढे केला. स्वतः त्याला उचलून जवळच्या देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मदत केली.

इतक्यावरच न थांबता, मिळालेल्या माहितीनुसार आमदार साहेबांनी आपल्या वाहनातून संबंधित वाहनाचा पाठलाग करून पुढील कारवाईसाठी तत्परता दाखवली. मंगेशदादांचे हे संवेदनशील आणि तत्पर कार्य पाहून उपस्थित लोकांचे डोळे पाणावले.

चाळीसगाव नगरीला असे कर्तव्यदक्ष आणि जबाबदार आमदार लाभले हीच या घटनेतून स्पष्ट होते. “मंगेशदादा, तुम्ही खरोखर देवमाणूस आहात!” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!