राहुल सोलापूरकरविरोधात मुस्लिम शिवप्रेमींचे जोडे मारो आंदोलन…

आबिद शेख/अमळनेर
राहुल सोलापूरकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्वरित अटक करा आदी घोषणेस सह एकता संघटन मुस्लिम शिवप्रेमी तर्फे रस्त्यात त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक घोषणांनी हादरले
भर दुपारी एकता संघटनेचे सभासद कोर्ट चौकात एकत्रित येऊन राहुल सोलापूरकर च्या विरोधात घोषणा बाजी करीत होते तर दुसरी कडे त्यांच्या प्रतीकृतीला जोडे मारण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच जो कोणी अशा प्रकारचे वक्तव्य करतो व थोर महापुरुषांचे अथवा देवी देवतांचे, प्रेशितांचे अपमान करतो अशा लोकांबद्दल विशेष कायद्याअंतर्गत त्यांना दहा वर्षाची शिक्षा होईल अशा प्रकारे कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात यांचा होता सहभाग
संजय पाटील, फारुक शेख, नदीम मलिक, मजहर पठाण,
मतीन पटेल, आरिफ देशमुख, सय्यद इरफान अली, इमरान गनी, ॲड आवेज शेख,सईद शेख, जावेद शेख, वसीम शेख, रमेश पाटील, अकील खान, ताहेर शेख, तौसीफ शेख आदींची उपस्थिती होती.