ब्रेकिंग न्यूज : पारोळा बायपासजवळ गॅस टँकर पलटी; गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आबिद शेख/अमळनेर
पारोळा बायपासजवळ आज सकाळी गॅस टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. गॅस गळतीमुळे कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.