हाजी उस्मान अँड हाजराबाई मुंडिया ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला..

आबिद शेख/अमळनेर
चाळीसगाव : हाजी उस्मान अँड हाजराबाई मुंडिया ज्युनिअर कॉलेजमध्ये ६ फेब्रुवारी २०२५ रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनाब गुलाम दस्तगीर साहेब होते. यावेळी संस्थेचे सदस्य जनाब हुसनोद्दिन सैय्यद साहेब आणि प्राचार्य सलीम खान सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य सलीम खान सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअरसाठी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमात प्राध्यापक साजिद खान, प्राध्यापक जावेद मिर्झा आणि प्राध्यापक डॉ. हुसेन यांनी विद्यार्थ्यांना उपयोगी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी फराह नाज यांनी केले, तर आभार प्राध्यापक साजिद खान सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.