शिरुड येथे एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल, ग्रामपंचायती कडून निवेदन..

0

आबिद शेख/अमळनेर

शिरुड (ता. अमळनेर) येथे एसटी महामंडळाच्या बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज अमळनेर गाठणाऱ्या 100 ते 150 विद्यार्थ्यांसाठी ही गंभीर समस्या बनली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थी वेळेवर शाळा व महाविद्यालयात पोहोचू शकत नाहीत. बस पकडण्यासाठी धावाधाव करावी लागत असून, अनेकदा चालक वेग वाढवून बस न थांबवता पुढे नेत असल्याने वाद निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांकडे एसटी पास असतानाही त्यांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे, यामुळे आर्थिक भार देखील वाढला आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी शिरुड ग्रामपंचायत व उपसरपंच कल्याणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अमळनेर एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून बस थांबवण्याची मागणी केली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने या समस्येचे तातडीने समाधान करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!