अमलनेर शहरातील अवैध देहव्यापार बंद करण्यासाठी चर्चा – फारुख शेख यांची पुढाकार…

आबिद शेख/अमळनेर. – अमलनेर शहरात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय आणि दलालांमार्फत चालवले जाणारे देह व्यापार केंद्रे बंद करण्यासाठी फारुख शेख यांनी जळगावमध्ये जबाबदार नागरिकांसोबत बैठक घेतली. या चर्चेत अमलनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाने सहभाग घेतला.
या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन ती कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. अवैध व्यवसायामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम आणि गुन्हेगारी वाढीचा धोका लक्षात घेऊन, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत समाजातील जबाबदार व्यक्तींनी एकत्र येऊन अवैध देहव्यापार रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.