प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या संपन्न…

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या शैक्षणिक सहलीत पदवी ते पदव्युत्तर वर्गांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात लळिंग किल्ला, लांडोर बंगला, इतिहासचार्य वि.का. राजवाडे संशोधन केंद्र (धुळे), तसेच का.स. वाणी प्रगत अध्ययन संस्था (धुळे) या ठिकाणी भेटी देऊन ऐतिहासिक व साहित्यिक संदर्भांचा अभ्यास केला. मराठी भाषेचा अभ्यास आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने या अभ्यास दौऱ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
या अभ्यास दौर्यात एकूण २४ विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे (विभागप्रमुख), डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावीत, प्रा. किरण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.