मनोहर महाजन सर यांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

आबिद शेख/अमळनेर. अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात (कला शिक्षण परिषद) २०२५ मध्ये पंढरपूर, जि. सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमान्य विद्यालय, अंमळनेर येथील मुख्याध्यापक मा. मनोहर महाजन सर यांना मा. दत्तात्रय सावंत (मा. शिक्षक आमदार) यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या सन्मानाबद्दल मा. मनोहर महाजन सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!