तालुका क्रीडा स्पर्धेत विजेत्यांचा सन्मान; माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांचे मार्गदर्शन…

अमळनेर – समाजाचा ताण दूर करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी ज्ञानसंचय करा आणि मुलांना जगातील अद्ययावत माहिती द्या, असे आवाहन माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले. ते तालुका क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
८ फेब्रुवारी रोजी जी. एस. हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख उपस्थितींमध्ये गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी. ए. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी आदी मान्यवरांचा समावेश होता.
स्पर्धांमध्ये विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांचे निकाल असे –
क्रीडा स्पर्धा विजेते:
रनिंग (पुरुष) – अजय बोरसे (विजेता), महेंद्र पाटील (उपविजेता)
रनिंग (महिला) – दीपाली पवार (विजेता), रोहिणी पाटील (उपविजेता)
रस्सीखेच (पुरुष) – विजेता: बांधकाम विभाग, उपविजेता: फापोरे बीट
रस्सीखेच (महिला) – विजेता: अमळगाव बीट, उपविजेता: फापोरे बीट
क्रिकेट (पुरुष) – विजेता: बांधकाम विभाग, उपविजेता: आरोग्य विभाग
बुद्धिबळ (पुरुष) – विजेता: दीपक बोरसे, उपविजेता: संजय महाजन
बुद्धिबळ (महिला) – विजेता: पुनम पाटील
कॅरम (पुरुष) – विजेता: प्रमोद पाटील, उपविजेता: सागर नराल
बॅडमिंटन (पुरुष) – विजेता: डॉ. गिरीश गोसावी, उपविजेता: डॉ. अतुल चौधरी
बॅडमिंटन (महिला) – विजेता: मोहिनी पाटील, उपविजेता: आशा महाजन
सांस्कृतिक स्पर्धा विजेते:
गायन (पुरुष) – प्रथम: प्रवीण पाटील, द्वितीय: सोमनाथ विसपुते, तृतीय: चंद्रकांत पाटील
गायन (महिला) – प्रथम: योगिता साळुंखे, द्वितीय: दीपाली निकुंभ
नृत्य (पुरुष) – प्रथम: सुधीर चौधरी, द्वितीय: डॉ. कुणाल पवार
नृत्य (महिला) – एकल प्रथम: डॉ. पूजा वाघुले, समूह प्रथम: महिला मंच
नाटिका (पुरुष) – प्रथम: योगेश कापडणे
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच, परीक्षक, क्रीडा समन्वयक आणि स्पर्धा समन्वयकांचे विशेष योगदान राहिले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार शरद सोनवणे यांनी मानले.