मुबशेरा हनिफ मेवातीने पटकावला मिशन UPSC परीक्षेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक…

आबिद शेख/अमळनेर

जळगाव – अलफैज फाऊंडेशन, जळगाव आयोजित मिशन UPSC वार्षिक परीक्षा मध्ये रॉयल उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थिनी मुबस्शेरा हनिफ मेवाती हिने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
मुबस्शेरा हनिफ मेवातीचा अलफैज फाऊंडेशनचे अध्यक्ष अल्हाज अब्दुल करीम सालार सर यांच्या हस्ते सत्कार व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एजाज मलिक आणि जळगाव, परभणी, अमरावती, अमळनेर, भुसावल, यावल, पाचोरा या गावांचे मिशन UPSC वार्षिक परीक्षेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हारुन बशीर सर, अब्दुल कय्युम सर, वकार सर, नोमान सर यांनी विशेष मेहनत घेतली. मुबस्शेरा हनिफ मेवातीच्या या यशामुळे रॉयल उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा नावलौकिक वाढला असून, तिने भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.