इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनच्या शिवजयंती उत्सव समितीची स्थापना..

0

अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, सचिवपदी प्रताप सोनवणे यांची निवड

24 प्राईम न्यूज 13 Feb 2025. -इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनच्या शिवजयंती उत्सव समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, उपाध्यक्षपदी अजिम बागवान आणि शंकर जाधव, तर सचिवपदी प्रताप सोनवणे यांची निवड करण्यात आली.

इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. यामध्ये मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या उर्वरित कार्यकारिणीत संघटकपदी काशिनाथ वळवी, कोषाध्यक्षपदी रियाज कुरेशी, सल्लागार म्हणून डॉ. एम.ए. खान यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून अजिम पिंजारी, आप्पा वाघ, राहुल आखाडे, वसीम शेख आदींची निवड झाली.

शिवजयंती हा सोहळा सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या वेळी रघुनाथ राजपूत, वनराज भोई, रोहन मोरे, अनिल भोई, शाकीर बागवान, इरफान खाटीक, छन्नु पठाण, सैय्यद मकसुद, तौफीक पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!