अल्पशा आजाराने अहेमद शेख कुरेशी यांचे निधन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील कुरेशी मोहल्ल्यातील रहिवासी अहेमद शेख इसा कुरेशी (वय 64) यांचे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी, सोमवार अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, चार भाऊ असा परिवार आहे. ते नाजीम कुरेशी यांचे वडील होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.