नॅशनल हायस्कूल चाळीसगावमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड-ऑफ समारंभ उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर. नॅशनल हायस्कूल चाळीसगाव येथे 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड-ऑफ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. गुलाम दस्तगीर सर होते, तर विशेष अतिथी म्हणून श्री. शब्बीर खान यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात युसरा काझी हिने कुरआन पठणाने केली. मुख्याध्यापक सरांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. शाहिद सर व 10वीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिले, तर अध्यक्षांनी मौल्यवान विचार मांडून त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत, शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात वर्गशिक्षक शाहिद सर, मतीन सर, दानिश सर आणि नॅशनल हायस्कूल चाळीसगावच्या संपूर्ण शिक्षकवृंदांचा मोलाचा वाटा होता.