माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातच्या कार्यवाह पदी भीमराव महाजन यांची निवड..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात ची त्रैमासिक सभा नुकतीच दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मंडळाच्या जळगाव येथील माळी समाज वस्तीगृहात मंडळाचे अध्यक्ष प्रा.ए के गंभीर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माळी समाजाचं मुखपत्र मासिक ‘माळीभूषण ‘ चे संपादक भीमराव महाजन यांची क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात या तीन राज्यातील माळी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मंडळाच्या कार्यवाहपदी निवड कऱण्यात आली.
या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष प्रा ए के गंभीर सर,मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी अध्यक्ष नीलकंठ देवचंद महाजन, माजी जि प सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, उपाध्यक्ष सुरेश भिला महाजन, सचिव किशोर रतिलाल राजकुळे, सहसचिव योगेश भीमराव महाजन, पुंडलिक गंभीर चौधरी सर, दगडू भगवान महाजन, नरेश लक्ष्मण महाजन,संजय गंगाराम महाजन, सौ चित्राताई कैलास माळी, शांताराम नामदेव महाजन, सुरेश संतोष महाजन, प्रा. प्रकाश संतोष माळी, गुलाब संतोष महाजन, वासुदेव नारायण महाजन, दीपक महाजन सर,कैलास नामदेव महाजन, गणेश दौलत महाजन, लालचंद महाजन, शिवाजी लक्ष्मण महाराज, गिरीश महाजन, केलास शामराव महाजन
यासह मंडळाचे पदाधिकारी प्रतिनिधी समाज भवन चे व्यवस्थापक ज्ञानेश्वर माळी
उपस्थित होते.
यावेळी भीमराव महाजन यांच्या शाल व श्रीफळ देऊन पुढील कार्यासाठी मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या