अमळनेरमध्ये शिवजयंती उत्साहात; भव्य मिरवणूक, पारंपरिक कलापथकांचा सहभाग आणि रक्तदान शिबिराचे आयोजन..

0

आबिद शेख/अमळनेर. – अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, भव्य मिरवणुकीसह विविध पारंपरिक कलापथकांचा सहभाग आणि युवकांचे रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम आयोजिल्याचे समजते.

सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, अमळनेर नगरपरिषद हायस्कूलच्या मैदानातून सकाळी ९ वाजता या मिरवणुकीस मान्यवरांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत शाळकरी मुलांचे पथनाट्य, लाठ्या-काठ्यांचे कर्तब, महिला लेझीम, वाढी संस्था आणि भजनी मंडळांचा आकर्षक व दिमाखदार सहभाग शिवभक्तांसाठी विशेष ठरणार आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी होतात.

मिरवणुकीच्या व्यवस्थापनात विविध सामाजिक संस्थांचा सहभाग असून, विजय मारुती मंदिर येथे भावेश जैन यांच्याकडून लाडू वाटप, राज लाड यांच्यातर्फे पाच पावली मंदिर येथे अल्पोहार, बस स्टँड येथे निलेश फार्मा तर्फे लस्सी वाटप..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!