नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.. – एकता संघटनेची मागणी…

0

आबिद शेख/अमळनेर. महाराष्ट्रातील मदरशांबाबत वादग्रस्त विधान केल्याने भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात जळगाव जिल्हा एकता संघटना आणि अल हुफाज फाउंडेशन यांनी तीव्र आंदोलन केले. त्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत, संघटनेच्या वतीने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन आणि घोषणाबाजी

दुपारी ३ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी “नितेश राणे यांना अटक करा,” “त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,” “द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा” अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले.

अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज सादर

संघटनेचे प्रतिनिधी मुफ्ती खालीद, फारुक शेख, हाफिज परवेज, हाफिज रहीम पटेल, हाफिज वसीम कारी, कारी शफिक पटेल, हाफिज इमरान आदींनी अपर जिल्हा दंडाधिकारी भीमराव दराडे यांना तक्रार अर्ज दिला. त्यांनी हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात नदीम मलिक, मौलाना इमरान, सलीम इनामदार, बाबा देशमुख, अनिस शहा, मतीन पटेल, मजहर खान, अजीम शेख, आरिफ देशमुख, अजय पाटील, सुष्मिता भालेराव, रेखा जाधव, वसीम शेख, नजमुद्दीन शेख, इमरान गणी, सय्यद इरफान अली यांसह अनेकांनी सहभाग घेतला.

संघटनेची स्पष्ट मागणी

संघटनेच्या म्हणण्यानुसार, नितेश राणे यांची वादग्रस्त वक्तव्ये धार्मिक सलोख्याला धोका निर्माण करणारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!