तात्यासो वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त शाळांना पुस्तक भेट

आबिद शेख/अमळनेर. खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक तात्यासो वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त चेतन सोनार यांनी जैतपूर येथील माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेला पुस्तकांची भेट दिली. वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजावी आणि त्यांचे जीवन आनंदी व्हावे, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला या वेळी लेखिका दर्शना पवार यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तात्यासो वा.रा. सोनार यांच्या ‘चेतश्री प्रकाशना’ मुळे अनेक नवोदित लेखकांना लेखनाची संधी मिळाली आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा वारसा पुढे नेत, चेतन सोनार यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ग्रंथसंपदेचा उपक्रम हाती घेतला.