मढी ग्राम पंचायत सरपंच व ग्रामसेवकाला निलंबित करून कायदेशीर कारवाई करा: एकता संघटनेची मागणी..

0

24 प्राईम न्यूज 26 Feb 2025

अहिल्यानगर, तालुका पाथर्डी येथील मढी या गावातील ग्रामसभेने २२ फेब्रुवारी रोजी मुस्लिम समाजातील व्यक्तींना यात्रेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे व्यापार करू न देण्याचा जो ठराव केला त्या ठरावाचा निषेध व ठराव करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी जळगाव एकता संघटनेने जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एका तक्रार अर्ज ने केलेली आहे.

असविधानिक ठराव

ग्रामसभेने असविधानिक ठराव करून शेकडो वर्षे लोक अत्यंत एकोफ्याने व सर्वधर्मसमभाव जोपासून राहणारे असताना सुद्धा या यात्रेमध्ये मुस्लिम समाजास व्यवसाय करण्यास बंदी घालणारा ठराव केला त्याचे पडसाद भविष्यात पूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात व अशाच प्रकारची पुनरावृत्ती दुसरीकडे होऊ शकते म्हणून वेळीच अशा असविधानिक कृती करणाऱ्या विरुद्ध शासनाने कडक कारवाई करावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली.

तक्रार अर्ज सादर
एकता संघटनेचे हाफिज शफीक व फारुख शेख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी भीमराव दराडे यांना सदरचा तक्रार अर्ज सादर केला असून त्यात मढी गावाचे ग्रामसेवक अनिल सूर्यभान लवांडे व सरपंच संजय बाजीराव मरकड यांना त्वरित निलंबित करून सभेत उपस्थित ग्रामस्थ व लोकसेवक अनिल लवांडे व संजय मरकड यांच्यावर त्वरित कारवाई करून सदरचा ठराव ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्री यांनी आपल्या अधिकाराने रद्द करण्यात यावा अशा मागणीचे तक्रार वजा निवेदन सुपूर्द केले.

अपर जिल्हा दंडाधिकार्‍यांचे आश्वासन
सदर असविधानिक ठराव बाबत आपल्या भावना त्वरित शासनाला कळविण्यात येतील व अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासन दरबारी योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी भीमराव दराडे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश
हाफिज शफि, फारुक शेख, मजहर पठाण, मतीन पटेल, अनिस शहा, सलीम इनामदार, युसुफ पठाण, उमर कासिम, शाहिद तेली, रेहान पिंजारी, बागवान, इमरान शेख, समीर शेख आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!