रोटरी क्लब अमळनेरच्या अधिकृत क्लब व्हिजिटला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/अमळनेर -अमळनेर, दि. 21 फेब्रुवारी 2025 – रोटरी क्लब अमळनेरला डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराना आणि उपप्रांतपाल रो. डॉ. संदीप देशमुख यांनी अधिकृत क्लब व्हिजिट दिली. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी मंगल ग्रह मंदिर आणि रोटरी गार्डनला भेट दिली. सायंकाळी आयोजित सार्वजनिक सभेत प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला यांनी आतापर्यंत झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपप्रांतपाल रो. अभिजीत सुभाष भांडारकर यांनी प्रांतपाल खुराना यांचा परिचय करून दिला.
प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराना यांनी आपल्या मनोगतात रोटरी इंटरनॅशनलच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच रोटरी फाउंडेशनच्या विश्वासार्हतेबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी फाउंडेशनसाठी सातत्याने देणगी देण्याचे आवाहन केले. यावेळी, रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने शहरातील दोन शाळांना आर.ओ. वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आले.
रोटरी क्लब अमळनेरला सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. अजय रोडगे, तर आभार प्रदर्शन क्लब सेक्रेटरी रो. विशाल शर्मा यांनी केले.