जळगाव अलफैज शाळेविरोधातील आरोप खोटे, पोलिस तपासात सत्य बाहेर येईल – प्रशासनाचा दावा

24 प्राईम न्यूज 1 Mar 2025
जळगाव: अलफैज शाळेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हे सर्व आरोप खोटे असून पोलिस चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असा दावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शाळेचे प्रशासन व पदाधिकारी मुश्ताक सालार आणि मुख्याध्यापक आसीफ पठाण यांनी स्पष्ट केले की, शाळेची बदनामी करण्यासाठी काही जण कटकारस्थान रचत आहेत. गेंदालाल मिल आणि शिवाजी नगर परिसरात शाळा सुरू होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अशाच लोकांच्या चिथावणीवरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शाळेत ११०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असताना संस्थेची प्रतिमा मलीन करण्यामागे काहींचे कोणते हेतू आहेत, याचा तपास व्हावा, अशी मागणीही प्रशासनाने केली आहे. तसेच, या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.